खा. शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण
भारतीय जैन संघटना आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद कोरोनामुक्त करून मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी ’मिशन झिरो - औरंगाबाद’ या उपक्रमाचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पालकमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेशजी टोपे, आ. प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, प्रशांत बंब, अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेते विकास जैन, प्रशांत देसरडा, भारतीय जैन संघटनेचे ड गौतम संचेती, पारस बागरेचा, प्रवीण पारख, पारस चोरडिया, किशोर ललवाणी यांची उपस्थिती होती.










